1.69 कोटी फसवणूक प्रकरणात सोसायटीच्या अध्यक्षाला अटक
14 दिवसांची पोलिस कोठडी
प्रतिनिधी/ पणजी
मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या तक्रारींनंतर आर्थिक गुन्हे विभागाने (ईओसी) मेसर्स हरिओम मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांविऊद्ध 1 कोटी 69 लाख ऊपये फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या आरोपांची चौकशी करत आहे. या प्रकरणासंदर्भात, निरीक्षक नीलेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील ईओसी पथकाने मेसर्स हरिओम मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी किसन जाधव यांना अटक केली. त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2016 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आश्वासन देऊन आवर्ती आणि मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. आवश्यक परवानग्या न घेता सोसायटीने गोव्यात कार्यालय चालवल्याचा आरोप आहे. मुदतपूर्तीनंतर, जमा केलेली रक्कम गुंतवणूकदारांना परत केली नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 1 कोटी 69 लाख ऊपयांचे नुकसान झाले आहे.
ईओसी विभाग सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिका काय याबाबत तपास करीत आहे. तपासात कागदपत्रे गोळा करणे, आर्थिक व्यवहारांची छाननी करणे आणि जबानी नोंद करणे याचा समावेश असून हे काम सध्या सुऊ आहे. निरीक्षक नीलेश एन. शिरोडकर हे उपअधीक्षक फ्रान्सिस कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अर्शी आदिल, (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.