For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजकार्यकर्त्यावर ग्रामसभेतच काळाचा घाला

01:16 PM Feb 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
समाजकार्यकर्त्यावर ग्रामसभेतच काळाचा घाला
Advertisement

सामाजिक विषय मांडताना हृदयविकाराचा झटका, ग्रामसभा केली स्थगित : परिसरात शोककळा

Advertisement

तिसवाडी : सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभेत काल रविवारी दि. 8 रोजी दु:खद घटना घडली. 70 वषीय वरिष्ठ नागरिक ओलावियो फर्नांडिस यांचा ग्रामसभेदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. यामुळे ग्रामसभेत एकच धावपळ उडाली आणि संपूर्ण सभा अचानक थांबवावी लागली. ग्रामसभेत ओलावियो फर्नांडिस हे घरपट्टी विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले होते. आपल्या आसनावर जाऊन बसल्यानंतर ते अचानक खाली कोसळले. उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न झाला, पण ऊग्णवाहिका येण्यात उशीर झाल्याने नागरिक संतापले.  अखेर ग्रामस्थांनी स्वत:च त्यांना बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात येथे नेले, पण तेथे डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले ही घटना संपूर्ण गावासाठी धक्कादायक ठरली आहे.  ओलावियो फर्नांडिस हे सांताक्रूझचे रहिवासी होते. निवृत्त सरकारी कर्मचारी होते आणि स्थानिकपातळीवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते.

व्हॉलीबॉल रेफरी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये दु:ख व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी सांताक्रूझचे आमदार ऊडाल्फ फर्नांडिस यांनीही तत्काळ गोमेकॉत धाव घेतली आणि कुटुंबीयांना आधार दिला. ओलावियो फर्नांडिस यांच्या निधनामुळे रविवारची ग्रामसभा अचानक थांबल्याने हा विषय पुढे ढकलावा लागला. आता बोंडव्हाल तलावाबाबतची बैठक 11 फेब्रुवारी रोजी पाणथळ प्राधिकरणाची बैठक होणार आहे, ज्याचे अध्यक्षत्व मुख्यमंत्री प्रमोद सावंत करतील. सांता क्रूझ पंचायत बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष आर्थर डिसिल्वा यांनी सांगितले की, ‘आम्ही तलावाच्या प्रभावक्षेत्राचे 50 मीटरपासून वाढविण्याची मागणी करणार आहोत. यामुळे तलाव अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित राहील आणि अवैध बांधकामांना आळा बसण्यास मदत होईल.या घटनेमुळे ग्रामसभांच्या आयोजनात वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी ऊग्णवाहिकेच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ओलावियो फर्नांडिस यांच्या आत्म्याला शांतता मिळो आणि कुटुंबियांना धैर्य मिळो, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.