सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स भारतासह जगभरात डाऊन
अमेरिकेतून 29,000 पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतासह जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ची सेवा ठप्प झाली होती. उपलब्ध माहितीनूसार भारतासह जगातील देशांमधील वापरकर्त्यांना अॅप आणि डेस्कटॉप या दोन्ही ठिकाणी ऑपरेट करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या नवीन पोस्ट्स दिसत नाहीत किंवा लिंक्स लोड होत नाहीत. टाइमलाइनसुद्धा रिफ्रेश होत नसल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत 29,000 हून अधिक वापरकर्त्यांना याचा फटका बसला. अमेरिकेत, 29,000 हून अधिक वापरकर्त्यांनी काही मिनिटांतच सेवा बंद असल्याची तक्रार केली. याशिवाय, यूके, फ्रान्स आणि इतर देशांमध्येही सेवा बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. अहवालानुसार, प्लॅटफॉर्मच्या कोअर सर्व्हरच्या ग्लोबल सर्व्हिसमधील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. तथापि, कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
भारतात 4,500 हून अधिक तक्रारी
भारतात रात्री सुमारे 8:17 वाजल्यापासून, वापरकर्त्यांनी प्लॅटफॉर्ममधील त्रुटींबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सुमारे 1,200 लोकांनी तक्रार केली, परंतु 15 मिनिटांत, सकाळी 8:30 पर्यंत, ही संख्या 4,500 च्या वर गेली होती.बहुतेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की ते क्रीन खाली ओढून (पुल टू रिफ्रेश) वारंवार अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु क्रीन कोरी आहे किंवा फक्त लोड होत आहे.