मलेशियात अल्पवयीनांच्या सोशल मीडिया अकौंटवर बंदी
06:26 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
क्वालांलपूर
Advertisement
मलेशिया सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया अकौंट निर्मितीवर बंदी घालणारे नवे नियम लागू केले आहेत. आता फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि युट्यूब यासारख्या प्लॅटफॉर्म्सना वय पडताळण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स अकौंट तयार करु शकणार नाहीत. या नियमाचा भंग झाल्यास कंपन्यांवर 25 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 24 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. परंतु एखाद्या मुलाने नियम मोडून अकौंट तयार केल्यास त्याच्या आईवडिलांवर कारवाई होणार नाही.
Advertisement
Advertisement