For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणदूर संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू भेट

04:59 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पणदूर संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू भेट
Advertisement

सोनुर्लीतील नवयुवक मंडळाची सामाजिक बांधिलकी

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
केवळ क्रिडा आणि मनोरंजन कार्यक्रम नव्हे तर सामाजिक उपक्रमातून समाजात नेहमी अग्रेसर असलेल्या सोनुर्ली नवयुवक कला क्रिडा मंडळाने पणदूर संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक वस्तू भेट देत मराठी नवीन वर्षाची सुरुवात एका सामाजिक उपक्रमातून केली. कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमामध्ये गेले कित्येक वर्ष संस्थापक संदिप परब हे निराधार बांधवांसाठी सेवा देत आहेत.रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सुरु केलेल्या या आश्रमात आज १८० निराधार आनंददायी जीवन जगत आहेत.मनोरुग्ण, शरीराने पीडित तसेच दिव्यांग वयोवृद्ध आणि लहान मुले आदी निराधारांची याठिकाणी नित्यसेवा संदिप परब आणि तेथील कर्मचारी वर्ग करत आहेत.श्री परब यांची ही सेवा लक्षात घेता या कार्यात खारीचा वाटा म्हणून नवयुवक कला क्रिडा मंडळ सोनुर्ली पाक्याचीवाडी यांनी जीवनावश्यक वस्तू आश्रमाला भेट देत श्री परब यांच्याकडे सूपुर्द केल्या.
यावेळी श्री परब याने आश्रमाचे काम आणि निराधार व्यक्ती बद्दलची माहिती सांगितली.नवयुवक कला क्रिडा मंडळाने आनंदाचा दिवस गुढीपाढवा संविता आश्रमाला भेट देत निराधार व्यक्तीसाठी एक प्रकारे साजरा केला तसेच मदत स्वरूपात जीवनावश्यक वस्तू दिल्या याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर यांच्यासह सत्यवान नाईक,नारायण नाईक,आनंद देऊलकर,राजन मठकर,रुपेश हिराप,सत्यवान हिराप,सचिन साळगावकर,सिद्धेश मसूरकर,ज्ञानेश मठकर,विनायक गावडे,अनिश हिराप,अंकुश मुळीक,आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.