For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी हौशी क्रिकेट संघटनेची सामाजिक बांधिलकी

12:03 PM May 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी हौशी क्रिकेट संघटनेची सामाजिक बांधिलकी
Advertisement

सामाजिक संस्थांना ८० हजाराचा निधी प्रदान

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

तालुका हौशी क्रिकेट संघटनेच्या वतीने एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. संघटनेकडे जमा असलेल्या एकूण ८० हजार रुपयांचा निधी तीन महत्त्वाच्या सामाजिक संस्थांना सुपूर्द करण्यात आला आहे. क्रिकेट संघटनेच्या या मदतीमुळे सामाजिक कार्याला मोठा हातभार लागला आहे.​या उपक्रमांतर्गत इन्सुली येथील ‘ दिव्यांग संस्था, आरोस -दांडेली येथील ‘माऊली’ कर्णबधिर निवासी विद्यालय आणि रोणापाल येथील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘दयासागर’ छात्रालयाला ही आर्थिक मदत देण्यात आली. गरजू आणि वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या या संस्थांना संघटनेने दिलेली ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे.​हा स्तुत्य सामाजिक उपक्रम सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद शिरोडकर आणि खजिनदार आनंद आळवे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. या वेळी संघटनेचे पदाधिकारी महेश भाट, बाबा खान, राजा राणे, दिलीप सांगावकर, दत्ता कल्याणकर, अभय नाईक, प्रशांत बांदेकर आणि विनायक पराडकर यांनी उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.