सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून बंदीवानांसाठी घड्याळ भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्ह्यामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. सावंतवाडी कारागृह आणि जिल्हा कारागृहात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे अनेक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आनंद कांबळे यांनी येथे केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी आणि घड्याळ भेट देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कारागृहातील बांधवांच्या जीवनात आनंदाचा दिवस लवकरच उजाडून चांगली वेळ येण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या वतीने घड्याळे भेटवस्तू देत आहोत असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आनंद कांबळे, तुरुंग अधिकारी बी. डी आगवणे, प्रा.सतीश बागवे, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम, रवी जाधव, जीवन विद्या मिशन मुंबईच्या सौ रमा परब, मधुकर सावंत, आदी उपस्थित होते.