सामाजिक कार्यकर्ते महेंद्र दळवी यांचे निधन
05:34 PM May 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी : प्रतिनिधी
Advertisement
सावरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दळवी (50 ) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले . गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने गोवा - बांबुळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली . दळवी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. गावच्या विकासासाठी ते नेहमी झटत होते. सहा आसनी रिक्षा चालक-मालक संघटनेचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या अकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मनमिळावू , शांत स्वभावाने ते परिचित होते . त्यांच्यावर सावरवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच सौ. दळवी यांचे ते पती होत.
Advertisement
Advertisement