For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाव खाणारी साखर आली नियंत्रणात

06:22 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाव खाणारी साखर आली नियंत्रणात
Advertisement

► त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर साखरेचा दर प्रतिकिलो 75 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. मात्र आता दर नियंत्रणात येत असून घाऊक बाजारपेठेत 58 रुपये प्रतिकिलोपर्यंत आला आहे. त्यामुळे 12 रुपयांनी दर घसरल्याने गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे.

साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारकडून साखरेची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. त्यामुळे झपाट्याने दर खाली आले. ऐन सणासुदीच्या काळातच साखर आणि गुळाच्या दरात पुन्हा वाढ होईल या शक्यतेने अनेकांनी मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करून साठा केला. घाऊक बाजारपेठेत सध्या साखर प्रतिकिलो 58 तर किरकोळ बाजारपेठेत 60 रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. गूळ घाऊक बाजारपेठेत प्रतिकिलो 60 ते 62 रुपये तर किरकोळ बाजारपेठेत 65 रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केली जात आहे.

Advertisement

मंगळवार दि. 1 सप्टेंबरपासून साखरेचा साठा करणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. 10 टनापेक्षा जास्त साखरेचा पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळासाठी साठा करता येणार नाही.

Advertisement
Tags :

.