For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...म्हणून स्मिता पाटीलला नववधुप्रमाणे सजवून दिला अखेरचा निरोप

04:26 PM Dec 20, 2024 IST | Pooja Marathe
   म्हणून स्मिता पाटीलला नववधुप्रमाणे सजवून दिला अखेरचा निरोप
...so Smita Patil was given a final farewell dressed up like a bride
Advertisement

स्मिता पाटील ही भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रतिभाशाली अभिनेत्री होती. तिचे नाव नेहमी समर्पक अभिनयासाठी घेतले जाते. स्मिता पाटीलच्या अभिनयाने केवळ हिंदी नव्हे तर मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांनाही समृद्ध केले.

Advertisement

स्मिताचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ साली पुण्यात झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक म्हणून केली होती. १९७० च्या दशकात भूमिका, मंथन, चक्र, अर्थ, निशांत, आणि मिर्च मसाला यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली. तिने विविध भाषेतील समांतर सिनेमांमध्येही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पुढे स्मिता पाटील हिने अभिनेता राज बब्बरशी लग्न केले.  तिच्या बाळंतपणादरम्यान शरिरांतर्गत झालेल्या संसर्गामुळे तिला अकाली या जगाचा निरोप घ्यावा लागला. १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले. यावेळी स्मिताचा मुलगा म्हणजे अभिनेता प्रतिक बब्बर हा अवघा १५ दिवसांचा होता. वयाच्या ३१ व्या वर्षीच स्मिताला जागाचा निरोप घ्यावा लागला.

Advertisement

स्मिताने मृत्युपूर्वीच सांगितले होते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला नववधूप्रमाणे सजवा. तिची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्मिताच्या पार्थिवाला नववधूप्रमाणे सजवले गेले होते. तिचा यावेळी मेकअपही करण्यात आला होता.

स्मिता पाटीलने अभिनय केलेले साधारण १४ सिनेमे तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. तिच्या भारतीय सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला १९८५ साली सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला दोनवेळी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

स्मिता पाटील ही केवळ अभिनेत्री नव्हती तर एक संवेदनशील व्यक्तिमत्वही होती. ती स्त्रियांवरील अन्याय, ग्रामीण भागातील समस्यांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत असे. तिच्या अभिनयात नैसर्गिकता आणि ताकद यांचा उत्तम समतोल होता.

आजही स्मिता पाटील हीचे नाव दर्जेदार अभिनय आणि प्रबोधनात्मक भूमिकांसाठी घेतले जाते. तिचे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी सदैव स्मरणीय राहील. तिच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.

Advertisement
Tags :

.