For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर पंद्दुचेरी पूर्ण राज्याचा दर्जा

06:25 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
   तर पंद्दुचेरी पूर्ण राज्याचा दर्जा
Advertisement

द्रमुक प्रमुख स्टॅलिन यांचे आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था/ पंद्दुचेरी

द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास पु•gचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाणार असल्याचा दावा रविवारी केला आहे. काँग्रेस उमेदवार अणि वर्तमान खासदार व्ही. वैथिलिंगम यांच्या समर्थनार्थ प्रचार करताना स्टॅलिन यांनी हे आश्वासन दिले आहे. द्रमुक आणि काँग्रेस पु•gचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

Advertisement

पंद्दुचेरी मुख्यमंत्री एन. रंगासामी हे केंद्राच्या हातचे बाहुले आहेत. केवळ तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांच्या अधिकारांचे रक्षण केले जावे असे नाही तर पंद्दुचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकारांचे रक्षण केले जावे अशी आमची इच्छा आहे. पंद्दुचेरी ला केंद्रातील भाजपच्या सरकारमुळे कुठलाच लाभ झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ धर्म आणि जातीच्या नावावर प्रचार करत आहेत. मोदींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल वर्गांची स्थिती सुधारण्यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या नाहीत असा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

कराईकलच्या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक केली जाते. मच्छिमारांना या त्रासापासून वाचविण्यासाठी पंतप्रधानांनी काय केले? पंतप्रधानांनी केंद्रशासित प्रदेशाला सर्वश्रेष्ठ पंद्दुचेरी करण्याचे स्वत:चे आश्वासन पूर्ण करण्यासाठी काहीच केले नाही अशी टीका स्टॅलिन यांनी केली आहे.

केंद्रशासित प्रदेशात 9 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण हत्येच्या घटनेने पूर्ण देश हादरून गेला आहे. ही घटना पु•gचेरीतील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा पुरावा आहे. भाजपच्या शासनकाळात महिलांना कुठलीच सुरक्षा नव्हती असा दावा द्रमुक प्रमुखांनी केला.

इंडिया आघाडी सत्तेवर आल्यासपंद्दुचेरीत सर्व निष्क्रीय उपक्रम पुन्हा सुरू केले जातील असे त्यांनी म्हटले आहे. पु•gचेरीतील एकमेव मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूतही त्याच दिवशी मतदान पार पडणार आहे.

Advertisement
Tags :

.