अगोदर 'स्मार्ट' सुविधा द्या मगच 'स्मार्ट' मीटर बसवा
...तर आंदोलन उभे केले जाईल ; उबाठा शिवसेना विभागप्रमुख संतोष मोर्ये यांचा इशारा
दोडामार्ग - वार्ताहर
निकृष्ट वीजवाहिन्या, गंजलेले पोल, मागणी असलेले ट्रान्सफार्मर या सुविधा पहिल्यांदा द्या मग स्मार्ट मीटर बसवा अन्यथा आंदोलन उभे केले जाईल असा इशारा उबाठा शिवसेना कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी दिला.श्री. मोर्ये पुढे म्हणाले, तिलारी खोऱ्यात वीज वितरणचा खेळखंडोबा सुरु आहे. जंगलमार्गे असलेल्या वीज वाहिन्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरत आहे. वीज वाहिन्या कधी कोसळतील हे सांगता येत नाहीत. ट्रान्सफार्मर तर उघडे आहेत काहींच्या क्षमता कमी आहेत. वीज सेवा देणारे कर्मचारी कुशल हवेत, वीज बिल रिडींग चुकीचे घेतले जाते अशा अनेक समस्या असताना स्मार्ट मीटर का? म्हणजे सुविधा मिळणार नाहीत आणि बिल मात्र यांना स्मार्ट हवे हे खपवून घेतले जाणार नाही. स्टाफ पूर्ण भरा, सगळ्या सुविधा द्या मग स्मार्ट मीटर बसवा असेही मोर्ये यांचे म्हणणे आहे.