बर्फ कमळ
बर्फ कमळ हा शब्द काही नवा नाही, परंतु जर कोणतेही फूल कमळाप्रमाणे दिसत असेल आणि ते बर्फाद्वारे तयार झालेले असेल तर त्याला बर्फ कमळच म्हणाल. प्रत्यक्षात या फुलांना फ्रॉस्ट फ्लावर, आइस फ्लॉवर किंवा सी-आइस म्हटले जाते. ही फुलं प्रत्येक ठिकाणी दिसून येत नाहीत, ती अत्यंत दुर्लभ मानली जातात.
सर्वसाधारणपणे हे फूल 3-4 सेंटीमीटर व्यासाचे असते, ही फुले गुच्छांमध्ये उगतात, अनेकदा पाण्याच्या पृष्ठभागावर ती उगवत असतात. थंड समुद्र किनाऱ्यांनजीक ही फुलं दिसून येतात. प्रत्यक्षात ही बर्फाचे पापुद्रे असतात, जी अत्यंत कमी तापमानात निर्माण होत असतात. विशेषकरून आर्क्टिक महासागर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये याची निर्मिती होत असते.
जमीन जेव्हा गोठलेली नसते, परंतु त्यावरील हवा गोठत असते तेव्हा या फुलांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. पाणी गोठलेले असते, बाष्प किंवा दवबिंदू गोठू लागलेले असतात. यामुळे लांबच लांब आणि रुंद बर्फाचे थर गोठू लागलेले असतात. हे सर्व थंड हवेसोबत गोठत असतात. त्यावर येणारे बाष्प, आर्द्रता किंवा दव हे या फुलांची नवी पानं ठरत असतात.
हे बर्फ कमळ किंवा बर्फाचे फुल अत्यंत थंड ठिकाणी केवळ सकाळी किंवा संध्याकाळीच दिसुन येते. दिवसा तापमान वाढल्यावर हे लवकर वितळते किंवा गायब होऊन जाते. रात्र होताच हवामान पुन्हा अनुकूल झाल्यावर बर्फ कमळाची निर्मिती सुरु होते. विशेषकरून सावलीयुक्त भागांमध्ये याच्या निर्मितीला वेग येतो. तेव्हा तापमान उणे 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले असते.
सागरी पाण्यात सल्फेटचे प्रमाण अधिक असल्याने हे फूल तयार होत असते. उणे 22 अंश सेल्सिअस असणारी स्थिती सर्वात अनुकूल मानली जाते. परुंत याकरता पृष्टभागावर असलेल्या बर्फाचे तापमान फार कमी असू नये तसेच अधिकही असू नये. हवेचे तापमान त्याच्या तुलनेत कमी असले तरच या फुलाची निर्मिती होते.