For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्नूप डॉगच्या बायोपिकची घोषणा

06:50 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्नूप डॉगच्या बायोपिकची घोषणा
Advertisement

रॅपर स्नूप डॉगवर निर्माण होणाऱ्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. युनिव्हर्स पिक्चर्स हा चित्रपट 6 ऑगस्ट 2027 रोजी प्रदर्शित करणार आहे. हा चित्रपट स्नूप डॉगच्या एका कलाकारापासून मोठा म्युझिक मोगुल आणि गँगस्टा रॅप आयकॉन होण्यापर्यंतचा प्रवास दाखविणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रेग ब्रेवर करत असून तो ‘हसल अँड फ्लो’सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. जो रॉबर्ट कोल यांच्या मूळ कथेवर आधारित याची पटकथा असणार आहे. चित्रपटात स्नूप डॉगची व्यक्तिरेखा अभिनेता जोनाथन डेव्हिस साकारणार आहे. चित्रपटात स्नूप डॉगची प्रसिद्ध गाणीही सामील असतील, ज्यात ड्रोप इट लाइक इट्स होट, गिन अँड जूस, व्हॉट्स माय नेम आणि नथिनबट ए जी थिंग सामील आहे. स्नूप डॉग एक लोकप्रिय रॅपरच नव्हे तर गायक, गीतकार, अभिनेता, निर्माता, डीजे अन् व्यावसायिक देखील आहे. त्याने 1992 मध्ये स्वत:च्या कारकीर्दीस सुरुवात केली होती, तेव्हा तो डॉ. ड्रेचे गीत डीप कव्हर अन् अल्बम द क्रोनिकमध्ये दिसून आला होता. त्याच्या बायोपिकचे चित्रिकरण सुरू झाले असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Tags :

.