For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्निग्धा, रोहीत उपउपांत्यपूर्व फेरीत

01:07 AM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्निग्धा  रोहीत उपउपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

Advertisement

अव्वल मानांकित स्निग्धा कांता आणि बिगरमानांकित रोहीत गोबीनाथ यांनी मंगळवारी येथे परस्पराविरोधी विजयांसह केएसएलटीए आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूर ज्युनियर्सच्या उपउपांत्यपूर्व प्रवेश केला. मुलांच्या विभागात रोहितने पहिल्या फेरीत सातव्या मानांकीत प्रकाश सरनचा 2-6, 6-3, 6-2 असा पराभव करत धमाकेदार पुनरागमन केले. प्रकाशने सुरूवातीलाच पहिला सेट सहज जिंकला. रोहीतने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार प्रत्युत्तर देत आपली तीव्रता वाढवली आणि बरोबरी साधण्यासाठी त्याची लय शोधली. निर्णायक सामन्यांपर्यंत गती बदलली होती आणि भारतीय खेळाडूने त्याच्या देशबांधवांवर जवळजवळ दोन तासांत विजय मिळवला.

मुलींच्या एकेरीत, स्निग्धाने बिगरमानांकीत श्रीया देशपांडेला 6-2, 6-1 असे हरवून आगेकूच केली. अमेरिकेच्या नियांत बद्रीनारायणनने यशविन दहियाच्या आव्हानावर 6-7 (7-4), 6-3, 6-1 असा विजय मिळवला. पहिला सेट अत्यंत चुरशीचा होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.