Snake Blood | साप पाहताच अंगावर काटा येतो, पण 'या' देशात चक्क आवडीने पितात सापाचे रक्त; कारण वाचून थक्क व्हाल!
आरोग्यासाठी चक्क सापाचे रक्त! या देशातील अजब परंपरा चर्चेत
अनेक लोक आरोग्यासंदर्भात काळजी घेत असतात त्यासाठी नाना प्रकारचे उपाय करत असतात, हे खाणे ते पिणे, पण तुम्हाला जर कुणी सांगितले की, आरोग्यासाठी एका देशात चक्क सापाचे रक्त पितात, हे वाचुन धक्का बसला ना? साप पाहताच लोकांची पळतीबाई थोडी होते, त्या सापाचे रक्त एका देशात बडे चावसे पीते है! स्टॅमिना वाढवण्यासाठी हा खटाटोप करण्यात येतो. इतकेच नाही तर आरोग्यासाठी हे रक्त चांगले मानले जाते. केवळ रक्तच नाही तर सापाच्या त्वचेचा वापरही उपचार पद्धतीत करण्यात येतो.कोणता आहे हा देश असा प्रश्न तुम्हाला पडला असेल..
तर हा देश आहे इंडोनेशिया.... इंडोनेशियामध्ये हजारो वर्षांपासून पारंपरिक उपचार पद्धतीवर मोठा विश्वास ठेवला जातो. वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या माध्यमातून कोणताही आजार बरा होऊ शकतो, असा दावा या पद्धतीत केला जातो. विशेष म्हणजे, यात विविध औषधी वनस्पतींसोबतच प्राण्यांचा, प्रामुख्याने सापांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. इंडोनेशियाच्या जुन्या ग्रंथांनुसार, सापाच्या रक्तामुळे त्वचेचे गंभीर आजार बरे होतात. त्यासाठी सापाच्या त्वचेचा विशेष लगदा तयार केला जातो. इतकेच नव्हे तर, आता तिथे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर आणि हृदयरोगावरही सापाच्या विषाचा प्रयोग केला जात आहे. मद्यपान करण्यापूर्वी सापापासून तयार केलेले औषध घेतल्यास यकृतावर दारूचा विपरीत परिणाम होत नसल्याचाही दावा स्थानिक करतात, जो वैद्यकीयदृष्ट्या अतिशय धक्कादायक मानला जातो.
लष्कराच्या आहारात कोब्राचे रक्त!
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत सापाच्या विषाची खुली विक्री होते. ग्राहक सांगतील तसे जिवंत सापाला मारून त्याचे विष आणि रक्त दिले जाते. आश्चर्यकारक बाब म्हणजे, इंडोनेशियातील लष्कराच्या नियमित जेवणात 'कोब्रा'चे रक्त आणि मांस दिले जाते; यामुळे सैनिकांची ताकद वाढते असा तिथला समज आहे.
'किंग कोब्रा रेस्टॉरंट'चा मोठा व्यवसाय
इंडोनेशियातील सेमारंग, सेरंग आणि तेगल या मुख्य शहरांमधील बाजारपेठेत 'किंग कोब्रा रेस्टॉरंट्स' चालवली जातात. या रेस्टॉरंट्सच्या गोदामांमध्ये हजारो जिवंत कोब्रा साठवून ठेवलेले असतात. तिथे सापाच्या रक्ताला आणि मांसाच्या डिशेसना मोठी मागणी आहे. या अजब जगाची माहिती सध्या पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाचली आणि शेअर केली जात आहे.
स्कीन तजेलदार आणि ग्लोंइन्ग पितात सापाचे रक्त
इतकेच काय, तर तेथील महीला देखील आपली स्कीन चांगली व्हावी यासाठी सापाचे रक्त पितात, असे मानले जाते की, सापाचे रक्त पिले तर स्कीन तजेलदार आणि ग्लोंइन्ग राहते....