For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मृती मानधना वनडेत अग्रस्थानी

06:22 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मृती मानधना वनडेत अग्रस्थानी
Advertisement

वृत्तसंस्था,/  दुबई

Advertisement

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे भारताची सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवशीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

मालिकेत 58 आणि 31 अशा उल्लेखनीय धावा केल्यामुळे तिने द. आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टला (782) मागे टाकले. तिचे आता 790 गुण झाले आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये द. आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल तेंव्हा लॉराला हे स्थान पुन्हा मिळवण्याची संधी मिळेल. तिच्या शेवटच्या एकदिवशीय सामन्यात शतक झळकावताना, ऑस्टेलियाची अॅलिसा हिली क्रमवारीत 744 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. ती बेथ मुनी 749 आणि अॅशले गार्डनर 724 गुण घेत त्यांच्या मागे आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रित कौर ही नवव्या स्थानावर असलेली दुसरी भारतीय खेळाडू आहे. तर जेमिमा रॉड्रिग्ज 12 व्या स्थानावर आहे. एकदिवशीय मालिकेतील तिन्ही सामने गमावली तरी हरमनप्रितने (652) 53, 54 आणि 25 धावांमुळे फलंदाजांमध्ये चार स्थानांची बढत घेतली. गोलंदाजांमध्ये टॉप 10 मध्ये दिप्ती शर्मा ही एकमेव भारतीय आहे जी 10 व्या स्थानावर आहे.

Advertisement

महिला एकदिवशीय गोलंदाजी क्रमवारीत अॅलाना किंग अव्वल

महिला एकदिवशीय गोलंदाजी क्रमवारीत अॅलाना किंग (775) अव्वल स्थानावर पोहोचली. ज्यामुळे सोफी एक्लेस्टोनचे जवळजवळ चार वर्षांचे अव्वल स्थान संपुष्टात आले. गार्डनर तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या आठवढ्यात किंगने  16.71 च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या. तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात 10 षटकांत 33 धावांत 4 बळी मिळविले आणि यजमानांना 185 धावांनी विजय मिळवून दिला. यामुळे तिला तिच्या पहिल्या क्रमांकाच्या रेटिंगवर पोहोचवले. तिचे 775 रेटिंग देखील कारकिर्दीतील सर्वोच्च आहे. किंगसोबत अव्वल आठ स्थानांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहेत. गार्डनर तिसरे, अॅनाबेल सदरलँड पाचवे, मेगन शट सातवे आणि किम गार्थ आठव्या स्थानावर आहे.

अन्य खेळाडूंनाही क्रमवारीत बढती

तीनपैकी दोन टी-20 सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करुन बहुफॉर्मेट मालिकेचा भाग म्हणून तीन एकदिवशीय सामने ज्ंिांकले आणि मुनी, गार्डनर आणि हिली यांच्या माध्यमातून यश मिळवले. गार्डनर (516) ही एकदिवशीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्युजपेक्षा (418) ती जवळजवळ 100 रेटिंग गुणांनी पुढे आहे. सदरलँडने (408) अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती केली आहे तर  जॉर्जिया व्हॉलने (534) ने तीन एकदिवशीय सामन्यांमध्ये सरासरी 54 धावा करुन फलंदाजांच्या क्रमवारीत 23 स्थानांची झेप घेतली आहे. दिप्ती पाचव्या स्थानावर असून ती अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय आहे.

Advertisement
Tags :

.