For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

स्मृती मानधनाची वन-डे क्रमावारीत घसरण

06:01 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मृती मानधनाची वन डे क्रमावारीत घसरण
Advertisement

हरमनप्रीतची आठव्या स्थानी झेप : दीप्ती शर्माचीही प्रगती

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसीच्या ताज्या महिला वनडे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करत आठवे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, भारतीय संघाची विद्यमान कर्णधार स्मृती मानधनाला फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले. झिम्बाब्वेविऊद्धच्या अलीकडील सामन्यांमध्ये 32 आणि शून्य धावा केल्याचा परिणाम तिच्या क्रमवारीवर झाला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने मानधनाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

Advertisement

हरमनप्रीतच्या क्रमवारीतील प्रगतीमुळे भारतीय फलंदाजांमध्ये तिचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता तिने पुन्हा दाखवून दिली. दीप्ती शर्मानेही फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत उल्लेखनीय प्रगती केली. दीप्तीने वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची प्रगती करत 23 वे स्थान मिळवले. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती दोन स्थानांनी पुढे जात चौथ्या क्रमांकावर पोहोचली. गोलंदाजांच्या क्रमवारीतही तिने एका स्थानाची सुधारणा करत आठवे स्थान मिळवले. त्यामुळे ताज्या क्रमवारीत दीप्तीच्या अष्टपैलू कामगिरीची विशेष नोंद झाली आहे.

युवा प्रतीका रावलची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी

भारतीय युवा फलंदाज प्रतीका रावल हिनेही वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत सात स्थानांची झेप घेत 21 वे स्थान मिळवले. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीचे स्थान ठरले आहे. भारतीय महिला संघातील नव्या खेळाडूंची कामगिरी आणि अनुभवी खेळाडूंचे सातत्य यामुळे संघाच्या फलंदाजीला बळ मिळत असल्याचे या बदलांतून दिसते.

टी-20 क्रमवारीत शेफाली, स्मृतीची प्रगती

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनीही प्रगती केली. फलंदाजांच्या यादीत शेफाली तिसऱ्या, तर स्मृती चौथ्या स्थानावर पोहोचली. दोघींनी प्रत्येकी एका स्थानाची सुधारणा केली. वनडे क्रमवारीत स्मृतीचे अव्वल स्थान गेले असले तरी टी-20 क्रमवारीतील तिची प्रगती भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक बाब ठरली आहे.

Advertisement
Tags :

.