स्मृतीचा वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम
06:22 AM Dec 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ बडोदा
Advertisement
भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधनाने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा जमविण्याचा विक्रम पुन्हा एकदा आपल्या नावे केला आहे.
Advertisement
विंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तिने 91 धावांची खेळी करताना गेल्या पाच सामन्यातील पाचवे अर्धशतक नोंदवले. या वर्षातील तिच्या आता 1602 धावा झाल्या असून तिने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वुलवार्टला मागे टाकले आहे. वुलवार्टने या वर्षात 1593 धावा जमविल्या. स्मृतीने दुसऱ्यांदा हा पराक्रम केला असून यापूर्वी 2018 मध्ये तिने हा विक्रम नोंदवला होता.स्मृतीला विंडीजविरुद्ध आणखी दोन सामने खेळावयास मिळणार असल्याने तिची धावसंख्येत आणखी धावांची भर पडणार आहे. याशिवाय या वर्षात तिने महिलांच्या टी-20 प्रकारांत सर्वाधिक 763 धावा जमविण्याचा विक्रम केला आहे.
Advertisement
Next Article