कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून चाकरमान्यांचा प्रवास सुसाट
खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वापात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वापीक वीजर ण्पुरवठ्यासाठी देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही बोगद्यात कायमस्वरुपी वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के.व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित केले होते. अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत सांशकता व्यक्त केले जात होती.
- .. तर जनरेटर कार्यान्वित
चाकरमान्यांच्या वाहनांची बेसुमार संख्या संख्या लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही बोगद्यात कायमस्वरुपी वीजपुरवठा कार्यान्वित होईपर्यंत विजेचा अडथळा निर्माण झाल्यास जनरेटरवरच बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
- विनाव्यत्यय वाहतूक
विजेसाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे लवकरच दोन्ही बोगद्यात ११ के.व्ही. वीज उपलब्ध होईल. यामुळे दोन्ही बोगद्यातून २४ तास विनाव्यत्यय वाहतूक सुरू राहून दोन्ही बाजूने वाहनचालकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल, असेही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.