महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जान्हवीच्या मृत्यूनंतर हसणारा पोलीस अधिकारी बडतर्फ

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेतील दुर्घटनेत झाला होता मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था /सिएटल

Advertisement

अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर असंवेदनशील टिप्पणी करणे आणि हसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. वॉशिंग्टनच्या नॉर्थईस्टर्न विद्यापीठाची विद्यार्थिनी जान्हवी कुंडला (23 वर्षे) 23 जानेवारी रोजी रस्ता ओलांडत असताना पोलिसांच्या एका वाहनाने तिला धडक दिली होती. हे वाहन केविन डेव नावाचा अधिकारी चालवत होता आणि तो एका अन्य प्रकरणाच्या तपासासाठी भरधाव वेगाने वाहन चालवत होता. वाहनाने धडक दिल्यावर जान्हवी 100 फूट अंतरावर जाऊन पडली होती.

सिएटल पोलीस विभागाकडून जारी ‘बॉडीकॅम फुटेज’मध्ये अधिकारी डॅनियल ऑडरर भीषण दुर्घटनेवर हसताना आणि असंवेदनशील टिप्पणी करताना दिसून आला होता. ऑर्डररच्या टिप्पणींमुळे कंडुलाच्या परिवाराला झालेला त्रास दूर करता येत नाही असे उद्गार सिएटल पोलीस विभागायच अंतरिम प्रमुख स्यू राह यांनी काढले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे सिएटल पोलीस विभाग आणि आमच्या पूर्ण पेशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. यामुळे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे काम आणखी अधिक कठिण झाले आहे. जनतेचा विश्वास टिकविण्यसाठी उच्च मापदंडांचे पालन करणे माझे संस्थेच्या प्रमुख म्हणून कर्तव्य आहे. संबंधित अधिकाऱ्याला सेवेत कायम ठेवणे म्हणजे पूर्ण विभागाचा अपमान ठरला असता. याचमुळे त्याला सेवेतून बडतर्फ केले जात असल्याचे स्यू राह यांनी म्हटले आहे.

भारताकडून मुद्दा उपस्थित

डेव एका ड्रग ओव्हरडोसच्या प्रकरणाच्या तपासासाठी जात असताना 119 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वाहन चालवित होते. या वाहनाची जान्हवीला धडक बसली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला होता. सिएटलमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article