For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साड्या चोरी प्रकरणातील महिलांच्या मुसक्या आवळल्या

10:33 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
साड्या चोरी प्रकरणातील महिलांच्या मुसक्या आवळल्या
Advertisement

शिर्डीमधून आठ जणांना घेतले ताब्यात : कारही जप्त, पोलीस पथक आंध्रप्रदेशला जाणार

Advertisement

बेळगाव : खडेबाजार येथील कापड दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करून किमती साड्या पळविणाऱ्या टोळीला खडेबाजार पोलिसांनी शिर्डीत अटक केली आहे. सहा महिला व दोन पुरुष अशा आठ जणांना अटक झाली असून गुरुवारी रात्री त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा, ए. बी. शेट्टी, आर. बी. रुद्रापूर, मोहन अरळगुंडी, व्ही. वाय. गुडमेत्री, गोपाल अंबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आठ जण आंध्रप्रदेशमधील गुंटूर व कृष्णा जिल्ह्यातील राहणारे असून बेळगाव येथील चोरीनंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हैसूर येथील एका कापड दुकानातही अशाच पद्धतीने कामगारांचे लक्ष विचलित करून साड्या पळविल्या आहेत. त्यानंतर ही टोळी शिर्डीत पोहोचली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बेळगावला आणले आहे.

गुरुवारी रात्री येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर सर्व आठ जणांना हजर करण्यात आले असून या टोळीने चोरलेल्या साड्या जप्त करण्यासाठी पोलीस पथक आंध्रप्रदेशला जाणार आहे. त्यामुळे त्यांना चौदा दिवसांसाठी पोलीस कोठडीत देण्याची मागणी करण्यात आली आहे. बेळगाव व म्हैसूर येथे चोरलेल्या साड्या त्यांनी आपल्या घरात ठेवल्याची माहिती मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार 2 नोव्हेंबरला आंध्रप्रदेशमधून त्या बेळगावकडे निघाल्या होत्या. एपी 09 सीयु 2700 क्रमांकाच्या कारमधून हे सर्व आठ जण बेळगावात आले होते. शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी खडेबाजार येथील विरुपाक्षी सिल्क अॅण्ड सारीज या दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून सुमारे दीड लाखाच्या नऊ साड्या पळविण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

Advertisement

अटकेतील संशयितांची नावे

1) इता सुनीता (वय 45) रा. ताडेपल्ली, जि. गुंटूर, 2) चाडला कनकदुर्गा (वय 36) रा. पोंडपल्ली, जि. कृष्णा, 3) मट्टपर्ती राणी (वय 33) रा. ताडेपल्ली, जि. गुंटूर, 4) देवरकोंड मणी (वय 39) रा. साईनगर, यनमला कुडूरू, विजयवाडा ग्रामीण, जि. कृष्णा, 5) मेच्चारप्पु रजनी (वय 30) रा. कोंडपल्ले, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 6) पोन्न चुकम्मा (वय 50) रा. कोंडपल्ले, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 7) कनमुरली वेंकटेश्वर राव (वय 41) रा. तिरुवुरू रोड, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 8) उसुरूगंटी वेंकटेश्वरलु (वय 34) रा. जगय्यापेठ, जि. कृष्णा अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत.

Advertisement
Tags :

.