कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मार्ट वीज मिटरची जबरदस्ती वीज ग्राहकांवर नाहीच

05:02 PM Aug 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांची माहिती

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

स्मार्ट वीज मिटर हे कोणत्याही वीज ग्राहकाकडे जबरदस्ती बसवले जात नाहीत. वीज वितरणकडून तश्या प्रकारे कार्यवाही होणार नाही. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला अभिप्रेत असे काम करणे हेच शिवसेनेचे लक्ष राहील यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अशी भुमिका शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, दिपक पाटकर यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. स्मार्ट मिटर बाबत उबाठा तालुकाप्रमुख अज्ञान प्रगट करतं असून त्यांना समर्थन देणारे मित्र पक्ष व सहकारी महाअज्ञानी आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या महायुतीचे मंत्री, आमदार, खासदार, पालकमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे टिका करून विरोधकांनी आपले अज्ञान प्रगट करू नये. असा सल्ला ही दिपक पाटकर यांनी दिला. दिलेल्या प्रसिद्धी पत्रात दिपक पाटकर म्हणाले, शासनाची स्मार्ट मिटर बसवणे ही योजना मोफत आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याना तो बसविला जात आहे. कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. या सर्व प्रक्रियेत शिवसेना शिंदे गट जनतेसोबत आहे. आम्ही 100 टक्के समाजकारण करणारे आमचे दैवत बाळासाहेब आणि शिंदे साहेब यांचे शिवसैनिक आहोत. सत्तेत राहून सत्तेचा गैरउपयोग करणारे नाहीत तर सत्तेचा फायदा जनतेच्या कल्यानासाठी करणे हेच आमचे लक्ष आहे.मालवण शहरातील कमलाकर खोत यांचा जुना मिटर नादुरुस्त असल्याने व यूनिट आकारणी योग्य होत नसल्याने त्यांच्या अर्जा नुसार मिटर बदलणे बाबत कार्यवाही करण्यात आली. शासन नियमानुसार ही कार्यवाही झाली. त्या स्मार्ट मिटर जागी जुना मिटर सिरिज मध्ये बसवण्यात आला. असे असताना स्मार्ट मिटर जबरदस्ती बसवला असे सांगत त्यांनी उपोषण छेडले. त्यापूर्वी खोत यांना महावितरण ने उपोषण करू नये यासाठी 12 ऑगस्टला पत्र दिले होते. तरी ते उपोषणास बसले. आम्हीही त्यांना शिवसेनेच्या वतीने विंनती केली होती. महायुतीचे आपले सरकार पालकमंत्री आपले, आमदार आपले आहेत. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल. असे सांगितले. आताही त्यांच्या स्मार्ट मिटर बाजूला दुसरा मिटर वीज वितरणने बसवला असून दोघांचे युनिट रिडींग एक महिना घेऊन खात्री केली जाईल. स्मार्ट मिटर रिडींग योग्य असल्यास तो कायम ठेवला जाईल. युनिट रिडींग योग्य नसल्यास मिटर बदलला जाईल. असे वीज वितरणने सांगितले आहे. कुठेही जबरदस्ती होणार नाही हेच धोरण पालकमंत्री, आमदार यांचे आहे. असे दिपक पाटकर यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे यांचे सातत्याने लक्ष

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सक्षम मंत्री आहेत. मालवण महसूल मध्येही चांगले काम सुरु आहे. जनहिताचे दाखले रखडून राहत नाहीत. आमदार निलेश राणे हे सातत्याने संपर्कात राहून जनतेच्या दाखले व तत्पर सेवेसाठी सूचना देतात. 15 दिवसा पूर्वी प्रांतधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली. त्यामुळे दाखले पेंडिंग नाहीत. त्यामुळे महसूलवर टिका करणे योग्य नाही. हे टिका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असेही दिपक पाटकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article