For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात छोटे शहर

06:11 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात छोटे शहर
Advertisement

निवडक लोकांचे वास्तव्य

Advertisement

भारतात गावांमधून लोक जेव्हा मोठ्या शहरांमध्ये जातात, तेव्हा शहर अखेर कितवर फैलावले आहे हे पाहून दंग होतात. मोठा प्रवास करूनही शहरातून बाहेर पडणे सहज नसते. परंतु छोट्या शहरांमध्ये ही समस्या नसते. दिल्लीसारख्या शहरात 20-30 किलोमीटरचा प्रवास केल्यावरही तुम्ही दिल्लीतच असतात. परंतु छोट्या शहरांमध्ये इतक्या अंतरात तुम्ही शहरापासून खूप दूर गेलेला असता. जगातील सर्वात छोटे भारतातील अनेक छोट्या शहरांपेक्षाही छोटे आहे.

युरोपमध्ये क्रोएशिया नावाचा देश असून तेथील हुम हे जगातील सर्वात छोटे शहर आहे. हे शहर बुजेट नावाच्या शहरापासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे. शहरात केवळ 20 ते 30 लोकांचे वास्तव्य असून केवळ 2 प्रमुख रस्ते आहेत. हे शहर इतके छोटे असताना त्याला गाव का मानले जात नाही असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. परंतु हुममध्ये टाउन वॉल, टाउन गेट, दफनभूमी, दोन चर्च आणि रेस्टॉरंट आहे. याचबरोबर येथे काही इमारती आहेत. हे शहर 12.95 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे.

Advertisement

हुममध्ये 16 व्या शतकापासून नगरपालिका आहे. याचमुळे याला शहर मानले जाते. हे शहर अत्यंत प्राचीन आहे. येथील रस्त्यांवर प्राचीन दगड लावण्यात आले आहेत. 11 व्या शतकात सर्वप्रथम येथे घरांची निर्मिती सुरू झाली होती. 1102 सालाच्या संदर्भात या शहराचा पहिला उल्लेख काही दस्तऐवजांमध्ये आढळून येतो. हे शहर क्रोएशियाच्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे कारने येता येते अणि सायकलिंग देखील केले जाऊ शकते.

या शहरात शेकडो वर्षापूर्वीचे किल्ले, भिंती आहेत. शहराच्या तटबंदीतच घरे निर्माण करण्यात आली होती. ही सर्व घरं 11 व्या शतकातील आहेत. या शहराला लूटपाट, युद्धाचा इतिहास लाभला आहे. शहराचा अलिकडचा लुक 19 व्या शतकात निर्माण करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.