For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारुळाप्रमाणे घर निर्माण करणार छोटे रोबोट्स

07:00 AM May 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
वारुळाप्रमाणे घर निर्माण करणार छोटे रोबोट्स
Advertisement

हार्वर्ड विद्यापीठ आणि आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी रोबोटिक मुंग्या किंवा आरआन्ट्स तयार केले आहेत. या रोबोट्सचे वैशिष्ट्या म्हणजे ते खऱ्या मुंग्यांप्रमाणे काम करतात. या तंत्रज्ञानाल एक्सबॉडीड इंटेलिजेन्सचे जबरदस्त उदाहरण मानले जातेय. हे रोबोट परस्परांमध्ये मिण्tन स्वत: काम करत असल्याने ते वैशिष्ट्यापूर्ण ठरले आहेत. संशोधकांनुसार एक्सबॉडीड इंटेलिजेन्सचा अर्थ अशा ज्ञानाशी आहे, जे केवळ रोबोटच्या आत नव्हे तर त्याच्या आसपासच्या पर्यावरणातही असते. वैज्ञानिक रोबोट्सच्या आसपास पर्यावरणात काही अशा खुणा सोडतात, जे त्यांना साथीदार म्हणून पुढील पाऊल उचलण्यास मदत करतात. वैज्ञानिकांनी याला स्टिगर्मी नाव दिले आहे. याकरता खऱ्या मुंग्या फेरोमोन नावाच्या रसायनचा वापर करतात.

Advertisement

आरआन्ट्स यासाठी फोटोर्मोन नावाच्या पद्धतीचा वापर करतात. जेव्हा एक रोबोट एखाद्या ठिकाणी लाइटची खुण सोडतो, तेव्हा दुसरे ते पाहून तेथे काहीतरी तयार करायचे आहे किंवा तोडायचे आहे हे समजून जातात. आरआन्टसला त्याचे स्वत: काम करण्याचे वैशिष्ट्या खास ठरविते. यात कुठलाही सेंट्रल कमांड किंवा कंट्रोलरची आवश्यकता नसते. जेव्हा रोबोट एखाद्या खास मार्करनजीक एकत्र येतात, तेव्हा ते स्वत:चा वेग वाढवितात आणि निर्माणाचे काम सुरू करतात. सोप्या नियमांचे पालन करत हे रोबोट्स कुठल्याही लिडरशिवाय संरचना उभी करू शकतात.

कुठे काम करणार हे रोबोट्स

Advertisement

भविष्यात जेव्हा माणूस चंद्रावर वसण्याची तयारी करेल, तेव्हा तेथील वातावरण अत्यंत प्रतिकूल असणार आहे. रेडिएशन, ऑक्सिजनचा अभाव आणि भीषण तापमानादरम्यान माणसांना घर निर्माण करणे जवळपास अशक्य असेल. अशास्थितीत आरआन्टस उपयुक्त ठरतील. माणसांना परग्रहावर वसविण्यापूर्वी हे छोटे इंजिनियर स्वत:च सुविधा आणि वास्तव्यस्थळ तयार करू शकतात. हे तंत्रज्ञान अंतराळात भविष्यातील वसाहतींचे स्वप्न साकार करण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग ठरू शकतात असा दावा करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.