अमेरिकेत घरांवर कोसळले छोटे विमान
07:00 AM May 24, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
सॅन दिएगो : अमेरिकेच्या सॅन दिएगो येथे एक छोटे विमान नागरी वस्तीवर कोसळल्याने 15 घरांना आग लागली आहे. तर विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला आहे. सेसना 550 विमान मान्टगोमरी-गिब्स विमानतळानजीक दुर्घटनाग्रस्त झाले. विमानातून किती जण प्रवास करत होते याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. परंतु विमानातील आसन क्षमता 8 इतकी होती. या दुर्घटनेत घरांबाहेर उभी असलेली वाहनेही जळून गेल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article