महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनमध्ये जमविले जाते छोट्या मुलांचे मूत्र

06:08 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारण जाणून घेतल्यावर धक्काच बसेल

Advertisement

खाण्यापिण्यावरून चीन अनेक देशांपेक्षा खूपच वेगळा आहे. जेथे अशा प्राण्यांचे मांस देखील विकले जाते, जे अन्यत्र खाण्याचा विचारही केला जात नाही. परंतु चीनमध्ये आणखी एक प्रकार घडतो. तेथे 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे मूत्र जमा पेले जाते. यात नवजात मुलगा एक महिन्याचा होण्याचा एक दिवसापूर्वीच मूत्र सर्वात मूल्यवान असते.

Advertisement

प्रथेमागे विचित्र कारण

या प्रथेमागे विचित्र पारंपरिक विश्वास आहे. पारंपरिक चिनी संस्कृतीत दीर्घकाळापासून मुलांच्या मूत्रात अनेक प्रकारच्या रहस्यमय शक्ती असतात अशी मान्यता राहिली आहे. यात ऊर्जेला बळ देणे आणि ताप कमी करण्यासारखे आरोग्याच्या लात्रापासून अध्यात्मिक लाभ यासारख्या मान्यता आहेत. तसेच यामुळे  वाईट आत्म्यांना दूर ठेवणे आणि चांगल्या नशीबाला बळ देणे देखील मान्यतेत सामील आहे.

ही प्रथा पारंपरिक धारणेतून निर्माण झाली आहे. यानुसार युवा मुलगे शुद्ध यांग  ऊर्जेचे प्रतीक असल्dयाचे मानले जाते. जे पौरुषत्व आणि अनंत जीवन शक्ती वाढवू शकतात. ऐतिहासिक स्वरुपात कीमियागारांनी एकेकाळी सम्राटांसमोर मुलांच्या मूत्राला ‘अमर जल’ म्हणून सादर केले होते. हे अमरत्व प्रदान करू शकते असा त्यांचा दावा होतो. मिंग राजघराण्यातील जियाजिंग सम्राटाने (1368-1644) शाश्वत जीवनाच्या शोधात  स्वत:च्या अमृत तयारींमध्ये याचा विशेषत्वाने  वापर केला होता.

पारंपरिक चिनी चिकित्सेत दीर्घकाळापासून मानवी मूत्राचा वापर होत राहिला आहे. रेन झोंग बाई हे मूत्राद्वारे निर्मित एक प्रसिद्ध चिनी औषध आहे. हे औषध उष्णता दूर करणे, सूज कमी करणे आणि रक्तस्राव रोखण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. औषधी काढा तयार करण्यासाठी मूत्राला पाण्यात मिसळल्याने त्याचा प्रभावीपणा वाढतो असेही मानले जाते. चीनमध्ये पोस्टपार्टममध्ये महिलांना कधीकधी सूपात हे मूत्र दिले जाते.

वाईट आत्म्यांपासून मुक्ती

अनेक लोक मुलाच्या मूत्राला प्लास्टिकच्या पिशवीत सील करून घरात ठेवतात, यामुळे मजबूत यांग यिन ऊर्जेचा प्रतिकार करता येईल असे त्यांचे मानणे आहे. तसेच वाईट आत्म्यांना घरातून बाहेर काढण्याचा यामागे विचार असतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article