कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छोट्या कारचे घर

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वत:चे घर असणे, ही आजच्या काळात एक कठीण बाब आहे. भूखंडांच्या आणि घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत, की मध्यमवर्गिय सोडाच, श्रीमंतांनाही घर किंवा भूखंड घेताना दहावेळा विचार करावा लागतो. कर्ज घेतले तरी स्वत:चे बरेच पैसे घालावे लागतातच. तेही कित्येकांना कठीण असते. तसेच आयुष्यभर कर्जाचे हप्ते फेडावे लागतात. त्यामुळे कित्येक सुखवस्तू लोकही घर न घेता भाड्याच्या घरात राहणे स्वीकारतात. ही स्थिती जगभरात आहे.

Advertisement

अमेरिकेत आज अनेक लोक निवृत्तीनंतर कारमध्येच आपले घर करतात. अमेरिकेतील एक निवृत्त ‘काई’ नामक महिला, एका अत्यंत छोट्या कारमध्ये रहात आहे. ही कार इतकी लहान आहे, की भारतातील नॅनो कारही मोठी वाटू शकेल. आपल्याकडे घर घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे कारमध्येच वास्तव्य केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे. तिची मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. सरकार वृद्धांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करते. तथापि, ही सुविध काई यांना त्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षी मिळणार आहे. सध्या त्या 65 वर्षांच्या आहेत. त्यामुळे आणखी 5 वर्षे त्यांना अशा स्थितीत काढावी लागणार आहेत.

Advertisement

त्यांच्या कारमध्ये जागा अत्यंत कमी आहे. त्यांच्या उंचीच्या मानाने कार अतिशय लहान आहे. त्यामुळे त्यांना पाय दुमडून झोपावे लागते. कारमध्ये टॉयलेटची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक टॉयलेटचा उपयोग करावा लागतो. कारमध्ये तीन गॅलन पाणी मावते, तेव्हढ्यावरच त्यांना दिवसभर काढावा लागतो. कारमध्ये केवळ खाण्याचे काही पदार्थ आणि काही कपडे मावण्याइतकी जागा आहे. स्नान कित्येकदा करता येत नाही. अमेरिकेत वर्षाचा बहुतेक काळ थंडी असल्याने स्नानावाचून फारसे अडत नाही. पाश्चिमात्य जगातली कुटुंब व्यवस्था उध्वस्त झाली आहे. त्यामुळे अधिकाराने आपल्या अपत्यांकडे वास्तव्यास जाण्याची सोय नाही. अशा स्थितीवर अमेरिकेचे समाजधुरीणही आता विचार करु लागते आहेत. भारतीय कुटुंब व्यवस्थेवर त्यांचा नव्याने अभ्यास चालला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article