For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुधवारी शेअर बाजारात अल्पशी तेजी

06:18 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुधवारी शेअर बाजारात अल्पशी तेजी
Advertisement

सेन्सेक्स 130 अंकांनी वधारला, एनर्जी, फार्मा निर्देशांक तेजीसह बंद

Advertisement

बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सकाळच्या सत्रात चांगली असलेली तेजी अखेरच्या क्षणी काहीशी घटली होती. एनर्जी व फार्मा निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली होती.

त. भा. वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 130 अंकांनी वाढत 77185 च्या स्तरावर बंद होताना दिसला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 26 अंकांनी वाढत 24078 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 295 अंकांच्या वधारासह 57757 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग तेजीसोबत बंद झाले तर निफ्टीतील 50 पैकी 25 समभाग तेजी दाखवत बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांकात पाहता 14 पैकी  9 बँका मजबूत होत बंद झाल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैसे कमकुवत झाला होता तर ब्रेंट व्रुड कच्चे तेल 85 डॉलरच्या आसपास राहिले आहे.

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांनी बुधवारी संमिश्र कामगिरी केलेली दिसून आली. यात ऑटो, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, ऑईल व गॅस तसेच फार्मा यांचे निर्देशांक हे मजबूतीसोबत बंद झाले होते. तर दुसरीकडे खराब कामगिरीत कमोडिटीज, सीपीएसई, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, रियल्टी यांचा समावेश होता. बँकिंग व केमिकल समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी बुधवारी केली.

हे समभाग तेजीत

विविध समभागांच्या कामगिरीचा उल्लेख करता इटर्नल, एसबीआय, आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, मॅक्स हेल्थकेअर, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, अपोलो हॉस्पिटल, मारुती सुझुकी, जियो फायनॅन्शीयल, एसबीआय लाइफ, श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हीएशन, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स इंडस्ट्रिज, टायटन, अदानी पोर्टस, टेक महिंद्रा, एशियन पेंटस्, आयशर मोटर्स, बजाज ऑटो यांचे समभाग हे तेजीत राहिले होते.

हे समभाग घसरले

दुसरीकडे काही समभागांची कामगिरी निराशादायी झाली. यात नेस्ले, टाटा मोटर्स पीव्ही, कोल इंडिया, ओएनजीसी, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, ट्रेंट, टाटा कंझ्युमर, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, हिंडाल्को, भारती एअरटेल, सिप्ला, अॅक्सिस बँक, डॉ. रे•िज लॅब्ज, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन टुब्रो, अदानी एंटरप्रायझेस, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग होते.

Advertisement
Tags :

.