For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात अल्पशी तेजी

06:49 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात अल्पशी तेजी
Advertisement

सेन्सेक्स 261 अंकांनी तेजीत, आयटी आणि मेटल समभागांची खरेदी, रुपया वधारला

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

कच्च्या तेलातली नरमाई त्याचप्रमाणे आयटी व मेटल समभागांच्या मजबूत कामगिरीचा फायदा भारतीय शेअरबाजाराला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेला दिसून आला. सुरुवातीच्या सत्रामध्ये शेअर बाजारात मोठी तेजी होती. अखेरच्या क्षणी ही तेजी कायम टिकू शकली नाही.

Advertisement

सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 261 अंकांनी वधारत 77763 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टीदेखील 95 अंकाच्ंया वाढीसोबत 24270 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकाने अल्पशा घसरणीसोबत बंद होण्यात समाधान मानले. हा निर्देशांक 93 अंकांनी घसरत 57939 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये पाहता 30 पैकी 16 समभाग मजबूत होत बंद झाले. उर्वरीत 14 घसरणीमध्ये होते. निफ्टीतील 50 पैकी 30 समभाग तेजीत होते तर 20 समभाग नुकसानीत होते. बँक निर्देशांकामध्ये 14 पैकी 7 समभाग तेजीत राहिले. रुपया 18 पैसे मजबूत होत बंद झाला. याचदरम्यान कच्चे तेल 71 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर राहिलेले पहायला मिळाले. स्मॉलकॅप निर्देशांक सपाट स्तरावर तर मिडकॅप निर्देशांक अल्पशा घसरणीत बंद झाला.

समभागांची कामगिरी

एचसीएल टेक, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, आयशर मोटर्स, टीसीएस, विप्रो, बजाज फिनसर्व, भारती एअरटेल, सनफार्मा, टाटा स्टील, ट्रेंट, इन्फोसिस, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कंझ्युमर, रिलायन्स, मारुती सुझुकी, इटर्नल, अदानी एंटरप्रायझेस, डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग तेजीसह बंद झाले. या शिवाय मिडकॅप निर्देशांकात एम आणि एम फायनान्शीयल, हुडको, अरबिंदो फार्मा, ओबेरॉय रियल्टी, एल अँड टी फायनान्स व मुथ्थुट फायनान्स यांनीही तेजी राखत बाजाराला आधार दिला. दुसरीकडे कोल इंडिया, पॉवरग्रीड कॉर्प, जिओ फायनान्स, एशियन पेंटस्, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, इंडिगो, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, एसबीआय, टाटा मोटर्स पीव्ही, कोटक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ, अदानी पोर्ट यांचे नुकसानीसोबत बंद झाले.

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास ऑटो आणि एनर्जी नुकसानीसह बंद झाले. याशिवाय कमोडिटीज, सीपीएसई, फायनान्सीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :

.