झोपलेल्या १० वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू! चांदोर येथील घटना
12:49 PM Sep 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील चांदोर नळीवाडी येथे सर्पदंश झाल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. केतकी महादेव बारमोडे (ऱा. चांदोर, नळीवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतकी ही २२ सप्टेंबर रोजी रात्री नेहमीपमाणे जेवण करुन झोपी गेली होती. रात्रीच्या सुमारास झोपेत अचानक साप चावल्याने केतकी जोराने ओरडली. केतकीच्या ओरडण्याने नातेवाईक जागे झाले. त्यांना घरामध्ये साप असल्याचे दिसले. केतकीला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement