झोपेत आकर्षक चित्र काढणारा ‘स्लीप आर्टिस्ट’
सकाळी काहीच आठवणीत राहत नाही
स्लीप आर्टिस्ट हा शब्द वाचल्यावर तो विचित्र वाटेल, झोपेत कठिणातील कठिण आणि आकर्षक चित्र तयार करणाऱ्या व्यक्तीला स्लीप आर्टिस्ट म्हटले जात आहे. वेल्सचा ली हॅडविनला स्लीप आर्टिस्ट या नावाने ओळखले जाते. हॅडविन बालपणापासून झोपेत गुंतागुंतीची चित्रं तयार करतो. आता त्याचे हे कौशल्य जगभरात ओळखले जाऊ लागले आहे. त्याच्या या रहस्यमय वैशिष्ट्यावरून अनेक कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत. हिस्ट्री चॅनेलच्या एका शोमध्ये त्याची कहाणी दाखविण्यात येणार आहे. झोपेत चालणे आणि झोपेत बडबडण्याविषयी तुम्ही ऐकले असेल. परंतु झोपत चित्र काढणे अत्यंत दुर्लभ आहे. जागेपणी जी कलात्मक प्रतिभा दाखविता येत नाही ती तो झोपेत करून जातो. ली हॅडविन जेव्हा झोपी जातो, तेव्हा झोपेत उठून चित्रं तयार करण्यास सुरु करतो. तो झोपेत आसपासच्या कुठल्याही गोष्टीचा वापर करत जटिल आणि आकर्षक चित्र तयार करतो. ली हॅडविन 4 वर्षांचा असताना झोपेत भिंतीवर लिहायचा किंवा आडव्या तिडव्या रेषा काढायचा.
15 व्या वर्षी मर्लिन मुन्रोचे चित्र
मी जेव्हा 15 वर्षांचा होतो, तेव्हा रात्री उठून कलाकृती तयार करायचो. मी मर्लिन मुन्रोच्या चित्रांपासून परी आणि अनोळखी सुंदर दृश्यही रेखाटत होतो. जेव्हा जागा असतो, तेव्हा त्याच साधनाचा वापर करत रात्री झोपत काढलेल्या कलाकृतीची नक्कल करू पाहतो, परंतु मी त्यात यशस्वी ठरत नाही, असे हॅडविन सांगतो.
ड्रॉवरमध्ये चित्रकलेची साधनं
बेडवर परत जाण्यापर्यंत मी चित्रं काढतो आणि नंतर मायग्रेन आणि थकव्यासोबत उठतो. झोपेत अश्व आणि मानवी आकृतींची चित्रंही काढतो. यात मर्लिन मुन्रोही सामील असून भूदृश्य आणि आकृत्या तसेच प्रतिमांच्या अतियथार्थवादी चित्रही काढले असल्याचे लीने सांगितले.
विचित्र वैशिष्ट्या ठरले रहस्य
एडिनबर्ग स्लीप क्लीनिक आणि आर्टवर्ल्डने त्याला वास्तवात अद्वितीय संबोधिले. विदेशातील डॉक्टर तसेच वैज्ञानिकांकडून त्याचे अध्ययन करण्यात आले आहे. परंतु रात्री उठून कलात्मक हालचाली अद्याप रहस्य आहे.