For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकाशातून ‘उडी’चा विक्रम

06:37 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आकाशातून ‘उडी’चा विक्रम
Advertisement

हे जग जसे विविध आश्चर्यांचे आहे, तसे विविध आश्चर्यकारक विक्रमांचेही आहे. काही जणांना असे विक्रम करण्याची आस असते. ते जीव धोक्यात घालून आपली ही हौस भागवून घेतात. असे विक्रम का केले जातात, हा व्यवहारी प्रश्न येथे संदर्भहीन ठरतो. कारण, या छंदाच्या जोपासनेसाठी तर्कबुद्धीही बाजूला सारली जाते. असाच एक विक्रम ऑस्ट्रिया देशाच्या एका ‘माऊंटन बायकर’ने केला आहे. त्याने 3 हजार 100 फुट उंचीवर हॉट एअर बलूनच्या साहाय्याने सायकलवरुन उडी मारण्याचा विक्रम नुकताच नोंदविला आहे. त्याने आकाशातून सायकलसह ही उडी मारली आणि पॅरेशूटच्या साहाय्याने तो तरंगत भूमीवर सुखरुप येऊन पोहचला. हा अशा प्रकारचा जगातील एक विक्रम असून त्याची नोंद झाली आहे.

Advertisement

या विक्रमवीराचे नाव एलिआस श्वार्जलर असे आहे. त्याने हा स्टंटसारखा विक्रम करण्यासाठी 2 वर्षे सराव केला. त्याचा हा स्टंट जितका रोमांचक, तितकाच धोकादायकही होता. त्याने प्रथम आकाशात जवळपास 3 हजार 100 फूट उंची गाठली आणि हॉट एअर बलूनवर आपली दुचाकी चालविली. याच बलूनवरुन त्याने 3 हजार 100 फूट उंचीवरुन खाली उडी मारली. यावेळी त्याच्या पाठीला पॅरेशूट बांधलेले होते. त्यामुळे तो आपल्या सायकलसह खाली अलगद उतरला. सर्वसाधारणपणे पॅरेशूटच्या साहाय्याने उडी घेतल्यानंतर जितका मार शरीराला बसतो, तितकाच त्यालाही बसला आणि त्याचे हे उड्डाण यशस्वी ठरल्याचे दिसले.

श्वार्जलर याने यापूर्वीही अनेक अशा प्रकारचे विक्रम नेंदविले आहेत. त्याने भूमीवर सायलिंग करुन 272 किलोमीटर प्रती तास हा वेग गाठून दाखविण्याचा विक्रम केला आहे. आजवर जगात इतक्या प्रचंड वेगाने सायकल कोणीही चालविलेली नाही. हा सायकलचा विक्रम त्याने 2022 मध्ये नोंदविला असून या विक्रमाची नोंद विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. तथापि, आकाशात हॉट एअर बलूनच्या पृष्ठभागावर सायकल चालविणारा तो जगातील प्रथमच विक्रमवीर ठरला आहे. त्याचा हा नवा विक्रम आता सोशल मिडियावर अतिशय लोकप्रिय झाला असून त्याला लक्षावधी लाईक्स मिळाले आहेत. तसेच प्रशंसाही मिळाली. भविष्यकाळात असे आणखी विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.