स्काय फोर्स चा ट्रेलर लॉन्च; २४ तारखेला प्रदर्शित होणार
मुंबई
बॉलीवूडचा फिट अभिनेता अक्षय कुमारचे गेल्यावर्षातील सिनेमे बॉक्स ऑफीसवर खास यश मिळवू शकले नाहीत. पण तरीही अपयशाने थांबला ते अक्षय कुमार कसला. सातत्याने काम करत राहणं, यश अपयश हा आयुष्याचा भागच आहे, यावर विश्वास ठेवणाऱ्या बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा नवा सिनेमा स्काय फोर्स २४ जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त हा देशभक्तीपर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक एक सत्य घटनेवर आधारित आहे. स्काय फोर्सचे दिग्दर्शन अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांनी केलेले आहे. तर अक्षय कुमार सोबतच सारा अली खान आणि वीर पहारिया या सिनेमात दिसणार आहेत. वीर पहारिया या सिनेमातून सिनेक्षेत्रात पदार्पण करत आहे.
भारताच्या इतिहासातील पहिल्या प्राणघातक हवाईहल्ल्यावर आधारित स्काय फोर्सचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. बघुया या नवीन वर्षात अक्षय कुमारचा या स्काय फोर्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय का ? सिनेमाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे, अमर कौशिक, साहिल बाबेर खान यांनी केलेली आहे.