For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कोडाची नवी स्पोर्टलाइन एसयूव्ही बाजारात लाँच

06:01 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कोडाची नवी स्पोर्टलाइन एसयूव्ही बाजारात लाँच
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

14 लाखापासून किंमत सुरु : अनेक वैशिष्ट्यांचा समावेश स्कोडाने आपली कुशाकची नवी स्पोर्टलाइन ही कार नुकतीच लाँच केली आहे. मध्यम आकारातील या एसयूव्ही कारची किंमत 14.70 लाख रुपये ते 17.40 लाख रुपये इतकी असणार आहे. या गाडीच्या बाह्य सौंदर्यामध्ये त्याचबरोबर अंतर्गत सौंदर्यामध्ये बदल करण्यात आला आहे. 1.0 लिटर आणि 1.5 लिटर पर्यायासह इंजिन सादर करण्यात आले असून ब्लॅक आऊट कॉस्मेटिक पॅकेजमध्ये हे मॉडेल लोकप्रिय आहे.

काय आहेत वैशिष्ट्यो

Advertisement

गाडीतील वैशिष्ट्यो ही कुशाकच्या मोंटेकार्लोप्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीला 17 इंच ब्लॅक अलॉय व्हील देण्यात आलेले असून अंतर्गत भागामध्ये ड्युअल टोन ब्लॅक आणि बेज कलरची योजना वापरण्यात आली आहे. इक्विपमेंटच्याबाबतीत विचार करता फुल एलईडी हेड लॅम्प, ऑटो वायपर, दहा इंचाचा टच क्रीन, सिंगल पॅन सनरुफ आणि सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.