स्कोडाच्या कायलॅकची मार्चमध्ये विक्रमी विक्री
कोलकाता :
कार निर्मिती कंपनी स्कोडा यांच्या कार्सना भारतीय ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली असल्याचे पाहायला मिळाले आहे. मार्च महिन्यात स्कोडाच्या वाहनांनी विक्रीमध्ये आपली कामगिरी उंचावण्यामध्ये यश मिळवले आहे.
मार्च किती झाली विक्री
विशेषता स्कोडाच्या कायलॅक या एसयूव्ही गटातील कारची लोकप्रियता अधिक दिसून आली आहे. मार्च महिन्यात या गाडीने विक्रीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मार्च 2025 मध्ये स्कोडा कायलॅकची विक्री 7422 इतकी झाली असून आतापर्यंतची ही सर्वाधिक मासिक विक्रीची संख्या मानली जात आहे. बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग हा स्कोडा कायलॅकचा ब्रँड अँबेसिडर बनवला गेला आहे.
फेब्रुवारीतही पसंती
मार्चच्या आधीच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीतही या गाडीला ग्राहकांनी चांगली पसंती दर्शवली होती. जानेवारी 2025 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 3636 कायलॅक गाडीची विक्री झाली होती. फेब्रुवारीतील एकूण वाहनांच्या विक्रीमध्ये एकट्या कायलॅक या कारचा वाटा 65 टक्के इतका राहिला होता.