कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑक्टाव्हिया पुन्हा सादर करण्यासाठी स्कोडा इच्छुक

06:48 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुढील महिन्यात होणार लाँच : 6 नोव्हेंबरपासून डिलिव्हरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी स्कोडा ऑटो इंडिया यांनी भारतीय बाजारात उच्च श्रेणीतील सेडान गटातील ऑक्टाव्हिया आरएस पुन्हा एकदा लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढील महिन्यामध्ये या गाडीची विक्री सुरु करणार आहे. तर गाडीची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होऊ शकते, असेही कंपनीने म्हटले आहे.

स्कोडा ऑटो इंडियाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलॅक या गाडीला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला होता. या नंतरच कंपनीने ऑक्टाव्हिया हिला पुन्हा  सादर करण्याचे ठरविले. सदरच्या नव्या गाडीचे बुकिंग 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात असून कंपनी सध्याला फक्त 100 गाड्याच आयात करणार आहे, असे समजते.

डिलीव्हरी आणि किंमत

सदरच्या वाहनांची डिलिव्हरी 6 नोव्हेंबरपासून केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदरच्या गाडीची किंमत किती ठेवण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण मात्र कंपनीकडून देण्यात आलेले नाही. ब्रिटनमध्ये या गाडीची किंमत 47 लाखाच्या घरात आहे. तेव्हा भारतामध्ये याची किंमत अधिक असू शकते, असे म्हटले जाते.

काय म्हणाले ब्रँड संचालक

स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की, सदरची ऑक्टाव्हिया ही कार कंपनी जीएसआर 870 नियमांतर्गत झेक प्रजासत्ताकमधून भारतात आयात करणार आहे. या नियमांतर्गत दरवर्षी कंपनीला 2500 इतक्या कार्स आयात करता येतात. त्यानुसार ही आयातीची कार्यवाही कंपनी येत्या काळात पार पाडणार आहे.

2004 साली पहिल्यांदा भारतात

भारतात 2004 मध्ये ऑक्टाव्हिया ही कार पहिल्यांदा दाखल झाली होती. त्यानंतर आतापर्यंत पाहिल्यास भारतात 1 लाख इतक्या ऑक्टाव्हिया भारतीय रस्त्यांवर दौडत आहेत. चौथ्या पिढीतील स्टँडर्ड ऑक्टाव्हिया 2023 पर्यंत भारतात स्थानिक असेंब्लीच्या माध्यमातून विक्री केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article