For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कोडा ऑटोचे रौप्यमहोत्सवी वर्ष, मासिक विक्री सर्वोच्च

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्कोडा ऑटोचे रौप्यमहोत्सवी वर्ष  मासिक विक्री सर्वोच्च
Advertisement

मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाचे रौप्य महोत्सवी वर्ष भारतातील न्यू एराला देखील साजरे करते, जेथे या उल्लेखनीय टप्प्यामध्ये भारतातील त्यांच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद झाली आहे. मार्च 2025 मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने 7,422 युनिट्सची विक्री केली, जी भारतातील ब्रँडद्वारे आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री आहे. नवीन कायलॅक एसयूव्ही लाँच करण्यासह रणवीर सिंग कंपनीचे पहिले ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर हे यश संपादित करण्यात आले आहे, जेथे जागरूकता आणि विचारसरणीला चालना मिळत आहे. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा या उल्लेखनीय विक्रीबाबत मत व्यक्त करत म्हणाले, “नवीन कायलॅकच्या लाँचसह आम्ही भारतातील आमच्या प्रवासामध्ये ‘न्यू एरा’प्रती कटिबद्ध आहोत. मार्च 2025 मध्ये आम्ही विक्री केलेल्या 7,422 कार्समधून या प्रवासाला मिळत असलेला आकार दिसून येतो, तसेच शाश्वत नियोजन, प्रयत्न आणि धोरणामुळे हा टप्पा गाठण्यात आला आहे, अधिकाधिक ग्राहकांना सक्षम करण्यासाठी आणि कायलॅकच्या यशाला साजरे करण्यासाठी आम्ही सुरूवातीची किंमत एप्रिल अखेरपर्यंत विस्तारित करण्याचे ठरवले.”

Advertisement

Advertisement
Tags :

.