कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्कोडा ऑटोने 20 लाख कार्स उत्पादनाचा गाठला टप्प

06:20 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात उत्पादनात केली वाढ : निर्यातीतही लक्षणीय कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया यांनी नुकताच 20 लाख इतक्या कार्सच्या उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. गेल्या 25 वर्षापासून कंपनी भारतामध्ये कार्यरत आहे. अलीकडच्या काळामध्ये कंपनीच्या व्यावसायिक वाहनांना भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी जागतिक निर्मिती कारखान्यांकडून सहाय्य मिळालेले आहे. एमक्युबी-एओ-इन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतामध्ये स्थानिक अभियांत्रिकीच्या संघाच्या सहाय्याने उत्पादनाला प्रारंभ करण्यात आला असून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 5 लाखाहून अधिक वाहनांचे उत्पादन करण्यात आले आहे. 5 लाख कार्सचे उत्पादन गेल्या साडेतीन वर्षात करण्यात आलेले असून भारतात बनलेल्या या कार्स आहेत. यामध्ये स्कोडा कुशाक, स्लाविया, कायलॅक आणि फोक्सवॅगन टायगून तसेच विर्टस या गाड्यांचे उत्पादन करण्यात येते.

प्रीमियम, लक्झरी कार्सना पसंती

स्कोडा ऑटो इंडियाने गेल्या दहा महिन्यांमध्ये पाहता सर्वाधिक कार विक्रीची नोंद केली आहे. 2025 मध्ये 61,607 वाहनांची विक्री करण्यामध्ये कंपनीला यश आले असून वर्षाच्या आधारावर पाहता दुप्पट वाढ झालेली आहे. फोक्सवॅगन इंडियासाठी दिवाळीचा महिना हा विक्रीमधला सर्वोत्तम ठरला आहे. प्रीमियम सेडन प्रकारामध्ये कंपनीचा वाटा आता 40 टक्के इतका झाला आहे. कंपनीच्या प्रीमियम आणि लक्झरी कार्स ग्राहकांचा प्रतिसाद नोंदणीय लाभतो आहे.

किती केली निर्यात

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियामार्फत सहा समूह जसे की स्कोडा, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्च्छे, लंबोर्गिनी आणि बेंटले यांच्या विक्रीचे भारतातील व्यवस्थापन पाहिले जाते. दुसरीकडे जर्मनीतील पोर्च्छेनेही भारतात विक्रीचे जाळे 13 सेल्स पॉइंटच्या माध्यमातून विस्तारले आहे. कंपनीची निर्यातही बऱ्यापैकी राहिली आहे. कंपनीने आजवर पाहता 7 लाख कार्सची निर्यात केली आहे. लॅटीन अमेरिका, आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया व मध्य पूर्वेकडील देशा यांना कार्सची निर्यात केली गेली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article