दूषित जलस्रोतामुळे लहान मुलांना त्वचारोग
गुहागर :
तालुक्यातील शृंगारतळी, जानवळे परिसरात गेले महिनाभर जलस्रोत दूषितचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. नदीच्या किनारी असलेले रहिवासी, व्यावसायिक यांच्याकडून सांडपाणी नदीत सोडल्याने इतर नागरिकांचे पाणवठे दूषित झाले आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होत असून लहान मुलांना त्वचारोगाने ग्रासले आहे. याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
शृंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील काही पाणवठ्यांचे स्त्राsत दूषित झाले आहेत. जवळच्या नाल्यात निवासी गाळे, टपऱ्यांचे सांडपाणे सोडल्याने याचा परिणाम आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेल यांच्या जलस्रोतांवर झाल्याने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे आरोग्य गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे या विरोधात तक्रारी गेल्या होत्या. ग्रामपंचायतीने गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाईबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे पत्र दिले आहे. त्या संदर्भ पत्राला अनुसऊन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने एकूण 38 जणांना नोटीसा पाठवल्या आहेत. दरम्यान, दूषित सांडपाणी सोडणारे रहिवासी, इमारत मालक, व्यावसायिक यांनी अद्याप सांडपाणी विल्हेवाट लावण्याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे अजूनही नाल्याला सांडपाणी वाहून जात आहे. ज्यांचे जलस्रोत दूषित झाले आहे. त्यांना ऐन उन्हाळ्dयात पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. लहान मुलांना अंगावर खाज येणे, पुरळ येणे, त्वचेला जखम होणे असे आजार सुरू आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा अजूनही या भागापर्यंत पोहचलेली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
- पाण्याची तात्पुरती व्यवस्था
सांडपाण्यामुळे जलस्रोत दूषित होऊन लहान मुलांना त्वचारोगाने ग्रासले आहे. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी जानवळे गावातील एका बोअरवेलवऊन पाण्याची व्यवस्था कऊन देण्याचे आश्वासित केले आहे. मात्र सध्या सुऊ असलेल्या सांडपाण्याबाबत योग्य निर्णय न झाल्यास महाराष्ट्र दिनी कुटुंबासह उपोषण करणार आहोत, असे जानवळेतील नागरिक मयूर भोसले यांनी सांगितले.
- अहवाल आल्यावर तातडीने उपाययोजना
आम्ही आमचे कर्मचारी पाठवून तेथील सर्वे करून त्या-त्या प्रकारे उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. लवकरच तेथील अहवाल आम्हांला मिळेल. तेथील नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊ, असे गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी सांगितले.