For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7100 वर्षांपूर्वीच्या महिलेचा सांगाडा

06:30 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
7100 वर्षांपूर्वीच्या महिलेचा सांगाडा
Advertisement

जगात आज जितक्या मानव प्रजाती आहेत, जवळपास त्या सर्वांमध्ये परस्परांचे जीन्स मिसळलेले आहेत. तरीही काही मानवसमूह असे आहेत, ज्यांच्या पूर्वजांचे सांगाडे वैज्ञानिकांना कधीच मिळाले नाहीत आणि ते त्यांचे अध्ययन करू शकले नाहीत. अशा मानव समुहांना घोस्ट वंश म्हटले जाते. अलिकडेच पुरातत्व तज्ञांनी एका प्राचीन महिलेचे अवशेष शोधले आहेत. हे अवशेष तिबेटींच्या एका रहस्यमय वंशावळीविषयी माहिती देणारे आहेत.

Advertisement

हा शोध चीनच्या शिंगयी पुरातत्वस्थळावर लागला आहे. अवशेष नवपाषाण काळातील (ख्रिस्तपूर्व 7000-2000 साल) आहेत. या महिलेला शिंगयी ईएन नाव देण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी प्राचीन चीनमध्ये आनुवांशिक विविधतेचे अध्ययन करण्यासाठी अनेक सांगाड्यांची तपासणी केली. यादरम्यान शिंगयी ईएनच्या जीनने एका अनोळखी मानवसमुहाचे संकेत दिले. शिंगयी ईएनचे जीवन तिबेटी आणि एक रहस्यमय घोस्ट वंशादरम्यानचे सूत्र ठरले आहे.

तिबेटी पठाराच्या रहिवाशांची वस्ती कशी बहरत केली याचे उत्तर यामुळे मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या अध्ययनांमधून तिबेटींमध्ये उत्तरपूर्व आशियाई वंशासोबत एक अनोखा घोस्ट वंश असल्याचेही कळले होते. हा घोस्ट वंश वैज्ञानिकांसाठी कोडं ठरला होता. शिंगयी ईएनच्या शोधामुळे या कोड्याची उकल करण्यास मदत होणार आहे.

Advertisement

जीनोममुळे झाले खुलासे

वैज्ञानिकांनी शिंगयी ईएनच्या आहाराचा आइसोटोप विश्लेषण केले. यातून ती शिकारी-संग्रहकर्ती होते, असे कळले. तिचा जीनोम पूर्व आणि दक्षिण आशियाई लोकांपेक्षा अत्यंत वेगळा होता. ती सुमारे 7100 वर्षांपूर्वी जिवंत होती. तिचा वंश अत्यंत वेगळ्या आशियाई समुहाशी जोडलेला होता. या समुहाचा डीएनए तिबेटींमध्ये असलेल्या घोस्ट वंशाशी मिळतो.

अत्यंत वेगळा वंश

घोस्ट वंश अशा मानवसमुहाला मानले जाते, ज्याचे सांगाडे मिळालेले नाहीत, परंतु डीएनए विश्लेषणातून त्यांच्या अस्तित्वाचा शोध लागतो. शिंगयी ईएनचा वंश निएंडरथल किंवा डेनिसोवन्सशी मिळताजुळता नाही. हे दोन्ही प्राचीन मानवसमूह आहेत. ज्यांचा डीएनए बऱ्याचअंशी आधुनिक मानवांशी मिळणारा आहे. वैज्ञानिकांनी या नव्या वंशाला बेसल एशियन शिंगयी नाव दिले आहे.

का खास आहे हा वंश

हा वंश हजारो वर्षांपर्यंत अन्य मानव समुहांपेक्षा वेगळा राहिला. या दरम्यान कुठलेच मिश्रण झाले नाही. संभाव्यत: शिंगयी ईन सारखे आणखी लोक होते, परंतु त्यांचे नमुने अद्याप मिळालेले नाहीत असे अध्ययनाचे सह-लेखक कियाओमेई फू यांनी सांगितले आहे. या क्षेत्रात राहणारे प्राचीन लोक पूर्व आणि दक्षिणपूर्व आशियाच्या प्रागैतिहासिक लोकसंख्येच्या सवालांचे उत्तर शोधण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असे अध्ययनात म्हटले गेले आहे. शिंगयी ईएनचा मिश्रित वंश दीर्घकाळापर्यंत अस्तित्वात राहिला. याने आजच्या काही तिबेटींच्या जीनमध्ये योगदान दिले आहे.

हे अध्ययनएका व्यक्तीच्या आनुवांशिक पुराव्यावर आधारित असल्याने वैज्ञानिकांनी खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शिंगयी ईएन आणि तिबेटी घोस्ट वंशादरम्यान संबंध समजून घेण्यासाठी संशोधनाची गरज आहे. हे संशोधन सायन्स नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

Advertisement
Tags :

.