For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृद्धाश्रमातील आगीत 16 वयोवृद्धांचा मृत्यू

06:26 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
वृद्धाश्रमातील आगीत 16 वयोवृद्धांचा मृत्यू
Advertisement

 इंडोनेशियातील हृदयद्रावक दुर्घटना

Advertisement

वृत्तसंसस्था/ सुलावेसी

इंडोनेशियात एका वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत सोळा वृद्धांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतातील मानाडो भागातील एका इमारतीत वृद्धाश्रम चालवला जात होता. येथे वास्तव्यास असलेले वयोवृद्ध लोक झोपलेले असताना आग लागल्यामुळे 16 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सोमवारी पोलिसांनी सांगितले. यातील 15 जणांचा मृत्यू गंभीरपणे होरपळल्यामुळे आणि एकाचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. पंधरा जणांना वाचवण्यात आले असून त्यांनाही इजा झालेल्या आहेत. होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

मध्यरात्रीच्या सुमारास आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणल्याचे वृत्त आहे. जवळच्या रहिवाशांनीही आग विझवण्यास मदत केली. विद्युत उपकरणातील बिघाडामुळे आग लागल्याचा दावा प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी केला आहे. तथापि, नेमके कारण सखोल चौकशीनंतरच उलगडणार आहे.

Advertisement
Tags :

.