केरळ-कोट्टायममध्ये सहा वाहनांची टक्कर
06:16 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
Advertisement
केरळच्या कोट्टायम जिह्यात रविवारी सकाळी झालेल्या अनेक वाहनांच्या धडकेत बारा जण जखमी झाले. हा अपघात कांजीरपल्लीजवळ घडला. जखमींपैकी तिघांना फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चार कार, एक ऑटोरिक्षा आणि एक दुचाकी अशा एकंदर सहा वाहनांचा समावेश होता. समोरील वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात कारने ऑटोरिक्षाला धडक दिल्यानंतर मागून येणाऱ्या इतर वाहनांनीही कार आणि ऑटोरिक्षाला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Advertisement
Advertisement