For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Anna Hajare on MP's Rebel "विश्वास, निष्ठा अन् आदर्शवाद"...उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांवर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी

02:32 PM Jun 24, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
anna hajare on mp s rebel  विश्वास  निष्ठा अन् आदर्शवाद    उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांवर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी
Advertisement

देशभरात चर्चेचा आणि धक्कादायक विषय बनलेली राजकीय घडामोड चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार थेट शिंदेच्या गोटात गेल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला. या विषयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली असताना आता या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही नापसंती दर्शवली आहे.

Advertisement

अण्णा नेमकं काय म्हणाले?

अण्णा हजारे म्हणाले की, पक्षांतर हे राजकारणातील निष्ठा, विचारधारा आणि आदर्शवादाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करते. आजच्या राजकारणात विश्वास, निष्ठा आणि आदर्शवाद यापैकी काहीही शिल्लक राहिलेले नाही. ज्यांच्या मनात देश आणि समाजासाठी काम करण्याची खरी तळमळ असते, ते आपला पक्ष कधीही बदलत नाहीत. काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अशी पावले उचलतात.

Advertisement

माहिती अधिकाराच्या कायद्यातल्या बदलावर नाराजी

अण्णा हजारे यांनी केवळ पक्षांतराच्या राजकारणावरच निशाणा साधला नाही, तर माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) केलेल्या बदलांविरोधातही मोहीम सुरू केली आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की, जर आरटीआय नियमांमधील दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत, तर ते ५ जुलैपासून राज्य सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू करतील.

अण्णा हजारे यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर आणि शिंदे सरकारवर प्रचंड दबाव आला आहे. एकीकडे सहा खासदारांच्या आगमनाने आपले संख्याबळ वाढल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत, तर दुसरीकडे अण्णा हजारे यांच्या कठोर भूमिकेमुळे महाराष्ट्र सरकारचा तणावही वाढला आहे.
Advertisement
Tags :

.