महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशन बंदोबस्तासाठी सहा हजार अधिकारी-पोलीस दाखल

11:17 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अप्रिय घटना टाळण्यासाठी खबरदारी

Advertisement

बेळगाव : सोमवार दि. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी 6 हजार अधिकारी व पोलीस बेळगावात दाखल झाले असून त्यांची राहण्याची व जेवणखाण व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या काळात अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. अधिवेशन बंदोबस्तासाठी बेळगावात आलेल्या अधिकारी व पोलिसांनी रविवारी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. बंदोबस्ताचे नियोजन किती स्तरावर करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार यांच्या सुरक्षेबरोबरच सुवर्ण विधानसौधसाठी करण्यात आलेली तयारी, मोर्चे, आंदोलने यासाठी केलेल्या तयारीची या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

Advertisement

300 अधिकाऱ्यांना बॉडीवॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. तर दहा ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहा पोलीसप्रमुख व दहा अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांना पाचारण करण्यात आले आहे. 38 डीएसपी, 100 पोलीस निरीक्षक, 230 हून अधिक पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 765 हवालदार व पोलीस, 150 महिला पोलिसांना यासाठी जुंपण्यात आले आहे. याबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील पोलीसप्रमुख, दोन अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख, पाच डीएसपी, 23 निरीक्षक, 25 उपनिरीक्षक, 750 हवालदार व पोलीस, 50 महिला पोलीस बंदोबस्तात असणार आहेत. राज्य राखीव दलाची 35, सशस्त्र दलाची 10 पथके मागविण्यात आली असून क्युआरटीची 8, एएससीची 16 पथके असणार आहेत. तातडीची परिस्थिती हाताळण्यासाठी गरुडा टीमही मागविण्यात आली असून श्वानपथक, बॉम्बशोधक पथकेही नियुक्त केली आहेत. बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी व पोलिसांना विविध हॉटेल व टेंटमधून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article