For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिवण बाजारातील सहा दुकाने आगीत खाक

07:35 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिवण बाजारातील सहा दुकाने आगीत खाक
Advertisement

लाखो रुपयांचे नुकसान : दुकानमालकांना सढळ हस्ते मदतीची गरज

Advertisement

  त. भा. प्रतिनिधी

सांगे सोमवारी सकाळी 8. 45 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत सांगे तालुक्यातील रिवण बाजारातील सहा दुकाने भस्मसात झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लाखो ऊपयांचे नुकसान झाले आहे. आग लागलेल्यांमध्ये दोन किराणा दुकाने, दोन हॉटेल्स, एक ऑफिस व एक दारूचे दुकान आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यात यश आले.

Advertisement

सुऊवातीला एका किराणा दुकानाला आग लागली. त्यानंतर त्याच्या बाजूने असलेल्या दोन हॉटेल्सना आग लागली. तेथे असलेल्या एका इन्शुरन्स एजन्टच्या ऑफिसला, अन्य एक किराणा दुकान आणि एक दारूचे दुकान अशी सहा दुकाने आगीत भस्मसात झाली. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन फायर ब्रिगेडनी आग विझविण्यात आली. पाच दुकानांतील संपूर्ण सामान खाक झाले तसेच दुकानाची कौले आगीने फुटून, जळून गेली आहेत. रिवण बाजारात ही दुकाने एकमेकाला लागून आहेत.

 सर्व दुकाने स्थानिकांची

घटनास्थळी उपस्थित असलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले की, रिवण येथील ही दुकाने खूप जुनी असून गावातील स्थानिक लोकच ही दुकाने चालवतात.  यापूर्वी याच ठिकाणच्या किराणा सोसायटीला आग लागली होती. आता हे पुन्हा संकट ओढवले आहे. घटनास्थळी सरपंच वैशाली नाईक, पंचायत सदस्य उमेश वेळीप व ग्रामस्थ हजर होते. रिवणच्या तलाठ्याने अहवाल तयार करून सांगे  मामलेदार कार्यालयाला सादर केल्याची माहिती मामलेदार विराज मलकर्णी यांनी दिली आहे

अन् तो तरुण रडू लागला ढसाढसा...

पाचही दुकाने आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून दुकानांमध्ये आता काहीही उरलेले नाही. यातील एक हॉटेल एका तऊण मुलाने नुकतेच सुरू केले होते, तो तिथे खूप रडत होता. त्याने नवीनच व्यवसाय सुरू केल्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. हे दृश्य पाहून सर्वांना खूप वाईट वाटत होते. या लोकांना आता मदतीची नितांत गरज आहे.

Advertisement
Tags :

.