For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंडखोर सहा खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश

06:43 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंडखोर सहा खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश
Advertisement

चार वर्षांनी पुन्हा चौकार नाही, षटकार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला 

Advertisement

त.भा. प्रतिनिधी, मुंबई,

शिवसेना (ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत हे सर्व खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी घोषणा करण्यात आली. या प्रवेशामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुऊवात झाली आहे.

Advertisement

बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी सुमारे दोन तास बैठक झाल्यानंतर शिंदे आणि सहा खासदार वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पोहोचले. तेथे पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय जाधव यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली. शिंदे यांनी सर्व खासदारांचे स्वागत करताना शिवसेना (ठाकरे)च्या नेतफत्वावर आणि कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

 दुसरा टप्पा सुरू

‘2022 मध्ये शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. तो लढ्याचा पहिला टप्पा होता. आज सहा खासदारांच्या प्रवेशाने दुसरा टप्पा सुरू झाला आहे. चार वर्षांनी चौकार नाही, तर षटकार मारला आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.

शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व जिथे आहे, तिथेच खरी शिवसेना आहे. हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. मतदारसंघाचा विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि बाळासाहेबांच्या विचारांशी निष्ठा जपण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे’.

आमच्याकडे आता तीन संजय

पत्रकार परिषदेत वातावरण हलकेफुलके करत शिंदे म्हणाले, ‘आमच्याकडे आता तीन संजय आहेत. चौथा संजय राठोडही आहे. त्यामुळे मी कोणत्या संजयबद्दल बोलतोय, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.’ त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिवसेना (ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांच्या या टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

खासदारांच्या कार्यशैलीचे शिंदेंकडून कौतुक

प्रवेश केलेल्या प्रत्येक खासदाराच्या कार्यपद्धतीचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. बंडू जाधव हे जमिनीशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले. संजय दिना पाटील हे बिनधास्त आणि बेधडक नेतफत्व करणारे जनतेचे खरे कैवारी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, ते मनाचे राजे आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. काहींनी त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना रिअल स्टार म्हटले जाते आणि ते खरोखरच रिअल स्टार आहेत.

नागेश आष्टीकर यांच्याबाबत बोलताना, ते बिनधास्त ओपनिंग बॅट्समन आहेत. कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण त्यांच्या वाटेला कोणी गेले, तर सोडत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांबाबत लागलेल्या दुर्दैवी निकालाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, या कठीण काळात त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.

Advertisement
Tags :

.