‘जैश’च्या सहा जणांना पुलवामामध्ये अटक
श्रीनगर :
काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवादी साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 आयईडी, 30 डिटोनेटर्स, आयईडीच्या 17 बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राउंड, 4 हातबॉम्ब आणि 20 हजार ऊपये रोख जप्त करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मदचे पाकिस्तानस्थित काश्मिरी दहशतवादी ब्र्रेनवॉश होऊ शकणाऱ्या तऊणांच्या शोधात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार दहशतवादी गटात सामील होण्यासाठी प्रेरित झालेल्या अनेक तऊणांची ओळख पटवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी या तऊणांच्या मदतीने आयईडी पेरण्यासाठी काही ठिकाणेही निवडली होती. त्या तऊणांना हँडलर आणि आयईडी बनवण्यासाठी पैसेही देण्यात आले होते. तसेच पिस्तूल, ग्रेनेड, आयईडीही पुरविण्यात आली होती. सदर तऊणांना टार्गेट किलिंग, सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकणे, सार्वजनिक ठिकाणे, बिगर काश्मिरी मजूर आणि आयईडी स्फोट यांसारख्या दहशतवादी कारवाया करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.