राज्यात दोन अपघातात सहाजण ठार
06:23 AM Feb 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
राज्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजण जागीच ठार झाले आहेत. बिदर जिल्ह्यातील हळ्ळीखेडच्या नागण्णा क्रॉसजवळ दुचाकी पुलावर आदळल्याने दाम्पत्यासह मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. वेंकट करटमल (वय 40), शिल्पा (वय 35) आणि मुलगी रक्षिता (वय 12, सर्वजण रा. राजेश्वर) अशी मृतांची नावे असून गंभीर जखमी दिगंबर (वय 15) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिदरहून आपल्या गावी परतताना ही दुर्घटना घडली. तर कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथे बोलेरो वाहन पल्टी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर 10 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आंध्रप्रदेशातील मदनपल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काम संपवून घरी परताना ही दुर्घटना घडली. श्रीनिवासपूर पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे.
Advertisement
Advertisement