For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरेबैल घाटात कार अपघातात बेळगावचे सहा जण जखमी

11:28 AM Jan 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
अरेबैल घाटात कार अपघातात बेळगावचे सहा जण जखमी
Advertisement

टँकरची अतिवेगाने येऊन कारला पाठीमागून जोराची धडक

Advertisement

कारवार : यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील गुळ्ळापूर येथे लॉरी उलटून 10 जणांचा ठार आणि 19 जण जखमी झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच गुळ्ळापूर जवळच्या अरेबैल घाटात लॉरीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अल्पवयीन बालकासह सहाजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने कारमधील एकाचा अपवाद वगळता अन्य पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी व्यक्ती बेळगावमधील असल्याचे सांगण्यात आले. जखमीची नावे संगय्या विरभद्र हिरेमठ, विवेकानंद बाळय्या हिरेमठ, अन्नपूर्ण हिरेमठ, स्वप्नील हिरेमठ, निंगप्पा कर्यन्नवर (कारचालक) आणि रीशा (वय 1 वर्ष) अशी आहेत.

या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, बेळगाव येथील हिरेमठ, कुटुंबीय फॉर्च्युनर कारमधून यल्लापूर-अंकोलामार्गे गोकर्णला निघाले होते. कार यल्लापूर-अंकोला दरम्यानच्या धोकादायक अरेबैल घाटात पोहोचली असताना, डांबराची वाहतूक करणाऱ्या टँकरने अतिवेगाने येऊन कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे कारची समोर असलेल्या कंटेनरला जोराची धडक बसली. कार कंटेनरमध्ये घुसल्याने कारचा दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून कारमधील एकाचा अपवाद वगळता अन्य कुणाला गंभीर दुखापत झालेली नाही. जखमींना उपचारासाठी यल्लापूर येथील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टँकर चालकाने वाहन अपघातस्थळी सोडून पलायन केले आहे. यल्लापूर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.